शिशुकुंज या शाळेतून 4 थी उत्तीर्ण झाल्यावर आठवते की स.वा.जोशी हायस्कूल मध्ये प्रवेश मिळणे फार कठीण वाटत होते. त्यावेळी झेड पी यांच्याकडे जाऊन आपले विद्यार्थ्याचे नाव द्यावे लागत असे. आणि उपलब्धतेनुसार शाळेमध्ये प्रवेश दिला जात असे.
अण्णा रिझल्ट लागल्यावर झेडपीच्या ऑफीसमध्ये जाऊन आले. घरी आल्यावर त्यांनी सांगितले की तुला महात्मा गांधी विद्यालयात प्रवेश मिळेल (कदाचीत ते माझी गंमत करण्याच्या दृष्टीने म्हणाले असावे) ते ऐकून माझा चेहरा एकदम उतरला.
पण दोन दिवसांनी त्यांनी मला सांगितले की तुला 5 वी मध्ये स वा जोशी मध्ये प्रवेश मिळाला आहे. तुकडी ब. ऐकून इतका आनंद झाला की काही विचारू नका ! पण मनात विचार होता की शिशुकुंजच्या माझ्या सर्व मित्रांना प्रवेश मिळाला असेल ना स वा जोशी मध्ये.
शाळेचा पहिला दिवस उजाडला. स.वा.जोशी विद्यालय सर्वार्थाने निराळे होते. शिशुकुंज शाळा मोठ्या बाई म्हणजे समेळ बाईंची शाळा म्हणून ओळखली जायची. बसायला सतरंज्या पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी हे चार वर्ग आणि छोटा शिशु आणि मोठा शिशु अशा दोन वर्गांसाठी एक मोठा हॉल अशी रचना. स.वा.जोशीचा डौल वेगळाच सकाळ आणि दुपार असे दोन सत्र. माझी रवानगी सकाळच्या सत्रामध्ये झाली होती. शाळेत अगदी ग, फ पर्यंत तुकड्या एकेका वर्गामध्ये 48 ते 55 पर्यंत पटसंख्या. आणि बसायला बाक किंवा बेंचेस.
पहिल्या दिवशी आमचे क्लास टिचर यादव सर आहेत असे समजले. ते आम्हाला गणित विषय शिकवणार होते. माझ्या शेजारी माझा मित्र सुशिल बारेकल बसायचा. एकेका बेंचवर तीन मुलं. यादव सर एक मोठे रजिस्टर घेऊन आले. आणि हजेरी झाली. गोडबोले सर इंग्रजी शिकवायला. बुटके नॅरो बॉटमची पँट आणी बुशकोट घालून कपाळाला बुक्का, गळ्यात माळ त्यांनी वर्गात गुडमार्निंग क्लास असे म्हणून जी एन्ट्री घेतली ती आजही स्मरणात आहे. त्यांनीच आम्हाला भारताची प्रतिज्ञा, इंग्रजीमध्ये प्लेज शिकवली, उच्चारासह, तालात ती कशी म्हणायची, आणि विद्यार्थ्यांन सांगितलं की जेव्हा माझा तास असेल तेव्हा आधीचा क्लास संपल्यावर आणि मी वर्गात यायच्या आधी सर्वांनी मोठ्यानी एकस्वरात ही प्रतिज्ञा म्हणायचे मुलांवर देखरेख ठेवण्यासाठी एक दिगंबर नावाचा अनुतीर्ण झालेला विद्यार्थ्याला नेमलं होते. तेव्हा गुरुजींची मोठेपण समजत नव्हतं पण आता समजत की सर्वांना कसं बरोबर घेऊन जायचं, केवळ हुषार मुलांनाच संधी देऊन चालणार नाही, तर वर्गातील सर्व गुणी, हुषार आणि सर्व साधारण विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन जाणं कीती आवश्यक असतं ते.
गोडबोले सरांनी शिक्षण वर्गाबाहेरही नेलं होतं. विविध खेळांच्या माध्यमातून संधी मिळताच ते आम्हाला वर्गाबाहेर न्यायचे आणि इंग्रजी शिकवायचे. त्यांना तबलाही छान वाजवता यायचा.
पी.टी. शिकवायला आपटे सर होते. छपरी मिशा राखलेल्या आपटे सरांची आम्हा विद्यार्थ्यांना फार भीती वाटायची. चित्रकला शिकवायला साखळकर बाई, शिवण शिकवायला संन्याशी बाई होत्या.
यादव सरांनी वर्गात शिकवायला सुरवात करतांना मला भागाकारच एक गणित फळ्यावर लिहिलं होतं. ते सोडवायला सांगितलं. गणित आणि माझा लहानपणापासूनच छत्तीसचा आकडा. गणित काही सोडवता आलं नाही. सरांनी मग अरे चौथीतलं साध उदाहरणही सोडवता येत नाही, काय हे असा शेरा मारला..
आज आठवतं की कोणत्याही अधिकारी व्यक्तीचा एखादाही शेरा अभिप्राय आपल्या मनावर किती परिणाम करत असतो ते.
आठवणी पुष्कळच आहेत. त्या सर्व तुम्हाबरोबर शेअर करायच्या आहेतच. आज निमित्त्य झालं कारण फेसबूकवर वाचलं की आपली शाळा सन 2011 मध्ये आपला अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. त्यासाठी संकेतस्थळही बनवलं आहे. ते आहे www.svj75.com. तर मित्रांनो या संकेत स्थळावर जाऊन सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली माहिती नोंदवावी आणि शाळेच्या उपक्रमामध्ये सर्वत-हेने सहभागी व्हावे.