आई कालच चित्रकूट येथून परत आली. तिने माझ्या साठी कबीरांच्या साखी अनुवाद आणला आहे. सध्या वाचत आहे. कबीरांनी अज्ञान, प्रपंच, पाप, छल आणि पाखंड यात अडकून पडलेल्या लोकांना सत्य, सदाचार आणि सहिष्णूता यांचा मार्ग दाखवला. समाजात साथी सारख्या पसरलेल्या पाखंड, गैर समजुती आणि कुप्रथांवर तीव्र प्रहार ( कबीर वाणी ) केले आणि समाजात सौर्हार्द, सुख आणि समानता निर्माण होण्यासाठी सतत प्रयत्न केला. कबीर वाणी आजही अमर आहे कारण त्यात शाश्वत सत्य प्रतिपादित केले आहे. प्राप्त ज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा आणि समाजाचा विकास कसा करता येईल हे कबिरांचे दोहे वाचून आपल्याला समजते. त्यांचे दोहे आपल्याला कार्यप्रवण करतात.
No comments:
Post a Comment